आसारामचा मुलगा नारायण साई दोषी, 30 एप्रिलला शिक्षा सुनावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। सुरत

गुजरातमधील आश्रमात महिला साधकांवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. नारायण साईला 30 एप्रिलला शिक्षा सुनावणार आहे.

सुरतमध्ये राहणाऱया दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण 11 वर्षे जुने होते. या प्रकरणात 53 जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्याला अटक झाली.