
सामना प्रतिनिधी। सेलू
येथील रेल्वे स्थानकासमोर उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. यात ही गाडी जळून खाक झाली आहे. गाडीतील वायर मध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील रेल्वेस्थानकासमोर असलेल्या एका हॉटेलवर जिटीएल कंपनीचे टॉवर आहे. त्याचे टेक्निशियन परशुराम बावडकर यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावली होती. पण अचानक गाडीतून धूर आला आणि तात्काळ गाडीने पूर्ण पेट घेतला. तातडीने नगरपालिकेची घंटागाडी आली आणि तिने आग विझवली. परंतु तोपर्यंत गाडी जळून पूर्ण खाक झाली होती.
या गाडीत टॉवर साठी लागत असलेले डिझेल मोठ्या प्रमाणात असते. परंतु सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी गाडीत डिझेल कॅन नसल्याने मोठी दुर्घटना टळली.































































