शिरूर तालुक्यात पारा 45 च्या वर; 50 वर्षातील उच्चांकी तापमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

उन्हाळ्यातील शिरूर तालुक्यातील सर्वांत उच्चांकी तापमानाची नोंद कवठे येमाईमध्ये झाली. दुपारी 2 वाजता पारा 45 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला. तालुक्यातील शिरूर 43 ,न्हावरे 41 शिक्रापूर 40 अंशापर्यंत तापमान पोहचले होते. गेल्या 50 वर्षातील शनिवारचे तापमान उच्चांकी असल्याचे सांगण्यात आले. तीन-चार दिवसांपासून तालुक्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नागरिक घरीच थांबणे पसंत करीत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी तापमानात प्रचंड वाढ झाल्याने मे महिना कसा जाणार असा प्रश्न नागरकांना सतावत आहे. त्यातच भर म्हणजे ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत भर पडत आहे.