दोन बांगलादेशी दहशतवादी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ढाका

ढाका शहराजवळ असलेल्या बसिला भागातील मोहम्मदपूरमध्ये दहशतवादी विरोधी पथक, रॅपिक ऍक्शन बटालियन (आरएबी) आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दशतवादी ठार झाले. रविवारी आरएबीने दहशतवाद्यांच्या ठिकाणाला वेढा दिल्यापासून चकमक सुरू झाली. सोमवारी पहाटे दोघा दहशतवाद्यांनी स्वतःला स्फोटकांसह उडवून दिले. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की त्यामुळे हा परिसर हादरून गेला. एकमजली घराला स्फोटानंतर आग लागली. 2016 साली ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 100 दहशतवादी ठार झाले असून अनेकांना अटक करण्यात आली आहे.