
सामना ऑनलाईन । रामपूर
भाजप उमेदवार जया प्रदा यांच्यावर अशोभनीय टीका केल्यामुळे 72 तासांची बंदी लादण्यात आलेले सपाचे जेष्ठ नेते आणि सपा-बसपा महाआघाडीचे रामपूरमधील उमेदवार आझमखान आपल्या बेताल वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपाताचे आरोप आणि धार्मिक तेढ वाढवणारे भाषण केल्याबद्दल आता निवडणूक आयोगाने आझमखान यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी लादली आहे. बुधवार सकाळपासून ही बंदी अंमलात येणार आहे.
“पूर्ण हिंदुस्थानात रामपूरच असे दुर्दैवी शहर आहे की तेथील एका समाजाचे मतदार मतदान करु नये यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आणला गेला. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या मतदारांना धमकावले”, असा आरोप आझमखान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहोळ्यात बोलताना केले होते.आझम यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर सखल घेतली आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे. नव्या प्रचार बंदीमुळे आझम खान दोन दिवस राज्यातील कोणत्याही जाहीर सभेत अथवा प्रचार रॅलीत भाषण करू शकणार नाहीत.शिवाय या काळात त्यांना राजकीय मुलाखतही देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
Election Commission bans Azam Khan again for violating poll code
Read @ANI Story | https://t.co/WzrYYlzX4g pic.twitter.com/KrJcsOMEXw
— ANI Digital (@ani_digital) April 30, 2019

























































