दुष्काळावर मात करण्यास सरकार सज्ज- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Maharashtra chief minister Devendra Fadnavis

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात दुष्काळाचं संकट मोठं असलं तरी राज्य सरकारने या संकाटावर मात करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

गडचिरोली हल्ला आणि राज्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात गुरुवारी राज्यातील मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यानुसार सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या विभागात जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर सर्वतोपरी मदत दुष्काळग्रस्त भागांना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.