
सामना प्रतिनिधी । मुंबई
पेन्शनसंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्टाने पेन्शन अदालत सुरू केली आहे. यामध्ये पोस्ट खात्याच्या पेन्शनर व्यक्ती आणि परिकाराला आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. फोर्ट येथील जीपीओ बिल्डिंगमधील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात 3 जुलै 2019 रोजी या पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन अदालतमध्ये अर्ज करण्यासाठीचा अर्ज महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईट https://www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.
























































