
सामना ऑनलाईन । अमरावती
आंध्र प्रदेशच्या पाच मतदान केंद्रावर सोमवारी फेरमतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. कडक ऊन असूनही मतदारांमध्ये उत्साह होता. तीन जिल्ह्यांमध्ये पाच मतदान केंद्रावर फेरमतदान सुरू आहे. य केंद्रांवर 49.64 मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे फेरमतदानाचे आदेश आयोगाने दिले होते. प्रत्येक केंद्रावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये 25 लोकसभा आणि 175 विधानसभेच्या जागेसाठी 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते.
























































