डोईफोडीच्या पात्रात आता फक्त दगड, धोंडे आणि वाळू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाने फास आवळला आहे. मुरबाड तालुक्यातील नदी, नाले, ओढे अक्षरशः आटून गेले असून इथल्या 25 गावे, पाडय़ांना पाणीटंचाईचे भीषण चटके सोसावे लागत आहेत. डोईफोडी नदीचे  तर वाळवंट झाले आहे. कोरडय़ा ठाक पडलेल्या या नदीतील दगडगोटे तुडवत परिसरातील हजारो गावकऱ्यांना जमीन खरवडून घोटभर पाणी शोधावे लागत आहे.