
सामना प्रतिनिधी । नगर
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा, पिंपळगावरोठा ता. पारनेर, जि. नगर येथे भंडारा डोंगराजवळ दोन वर्षांपूर्वी २०१७ ला नवीन बांधलेल्या पाऊत्का मंदिरात (खंडोबा पालखी विसावा स्थान ) येथे दावडी निमगाव येथील श्री खंडोबा देव, श्री म्हाळसा देवी, श्री बाणाई देवी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा व कलशावरोहण सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. या स्थानावर खंडोबाची पालखी तसेच यात्रेतील मनाच्या काठ्या या स्थानावर विसावा घेऊन नंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला होता. समस्त गायकवाड, सुपेकर, चिकणे आदी ग्रामस्थांनी मंदिर बांधकामासाठी देणगी देऊन सहकार्य केले होते. यावर्षी दुसरा वर्धापन दिन निमित्ताने दि.९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिली.
गुरुवार दि.९ मे रोजी सकाळी ६ वा अभिषेक, ७ वा पूजा, महाआरती, होम हवन व यज्ञ, सकाळी ९.३० ते ११ रमेश महाराज कुलकर्णी यांचे सुश्राव्य हरीकीर्तन होईल नंतर महाप्रसाद दुपारी ११. ३० वा पासून समस्त गायकवाड, सुपेकर परिवार, ग्रामस्थ पिपंळगावरोठा यांच्या तर्फे महाप्रसाद होणार आहे, देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग, दर्शनबारी नियोजन आहे तर जय मल्हार विदयालय व नाथ गगनगिरी सेवा मंडळ, भजनी मंडळे, तरुण मंडळे, ग्रामस्थ मुबईकर, पिपंळगावरोठा पंचक्रोशी यांचे सहकार्य व सेवा आहे.
या सोहळ्याचा कीर्तन श्रवनाचा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टतर्फे अध्यक्ष गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेन्द्र नरड, चिटणीस सौ. मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर सर्व विश्वस्त, ग्रामस्थ यांनी केले आहे.





























































