
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांचे अवघे तीन टप्पे राहिले असून निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार असून साऱ्यांनाच त्याचे वेध लागले आहेत. EVM मशीन वापरात आल्यापासून निकाल लवकर लागतात. मात्र यंदा निकालास चार ते पाच उशीर लागण्याची शक्यता आहे.
आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार निकालास यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. EVM च्या मतमोजणी सोबतच VVPT मशीनमधील चिठ्ठ्यांची गणना देखील केली जाईल. यामध्ये बराच काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी पेक्षा चार ते पाच तास निकाल उशिराने लागेल अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. EVM मशीन वापरात आल्यापासून नेहमी पहिल्या तीन-चार तासांत निकालाचे कल स्पष्ट होतात आणि संध्याकाळपर्यंत निकाल स्पष्ट होतो. मात्र यंदा संपूर्ण निकालास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

























































