हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार,कपिलदेव यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपचे पडघम वाजू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठsच्या स्पर्धेत दहा संघांमध्ये जेतेपदाची झुंज लागणार असून सहभागी देशांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी विराट कोहलीची टीम इंडिया अंतिम चारमध्ये पोहोचेल असा विश्वास व्यक्त करतानाच हिंदुस्थानच्या संघाचे कौतुकही केले आहे. हिंदुस्थानच्या संघामध्ये अनुभवी व युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा संघ सेमी फायनलमध्ये नक्की पोहोचेल, पण त्यानंतरचा प्रवास अवघड असेल. हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया व इंग्लंडही उपांत्य फेरीत पोहोचतील, असे कपिलदेव यांना वाटते