एमडीएफए बक्षीस सोहळा दिमाखात संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mdf-award

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

मुंबईकर ज्युनियर आणि सीनियर फुटबॉलपटूंसाठीचा आनंद सोहळा मानला जाणारा एमडीएफए ऍवॉर्डस् सोहळा कुपरेजवर मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना हिंदुस्थानचे ज्येष्ठ राष्ट्रीय फुटबॉलपटू रणजित थापा यांनी उमेदीतील कुपरेजवरील खेळाच्या आपल्या स्मृती अद्याप ताज्या असल्याची भावना बोलून दाखवली. थापा यांच्या हस्ते मुंबईच्या फुटबॉल क्षेत्राला समृद्ध करणाऱया ज्युनियर आणि सीनियर खेळाडू व त्यांच्या संघाचा चषक, सन्मानपत्र आणि पदके देऊन गौरव करण्यात आला.

ॉया सोहळय़ाला हिंदुस्थानचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, अंडर 17 विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करणारा गोलरक्षक धीरज सिंग, ज्युनियर इंडिया स्ट्रायकर अनिरुद्ध थापा, ब्राझीलचा जोसे रेमिरेझ बॅरेटो, आयएसएल स्टार राहुल भेके, शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार आणि आजी-माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू उपस्थित होते.