वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात दरोडा; सुरक्षा रक्षक- पुजाऱ्याला मारहाण करून 5 दानपेट्या लुटल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robbery in vajreshwari temple

सामना प्रतिनिधी । भिवंडी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मध्यरात्री 3 च्यासुमारास दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून मंदिरातील 5 दानपेट्यावर डल्ला मारत फरार झाले आहेत. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी याच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवून निषेध नोंदवणार आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीवनुसार 4 ते 5 दरोडेखोरांनी मिळून तलवार-चॉपरचा धाक दाखवून वॉचमनचे हातपाय रस्सीने बांधून ठेवले. तसेच पुजाऱ्याला मारहाण करून मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या आणि रक्कम घेऊन पळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, दरोड्याच्या घटनेनंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आज दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांना तशी माहिती देण्यासाठी म्हणून फलक लावण्यात आला आहे.