सातपुड्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वाघाची शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नाशिक

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात विस्तारलेल्या सातपुडा पर्वतराजीमधील वाघांची संख्या अचानक झपाट्याने कमी होत असून पैशांचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेतून गावकरीच या वाघांची कत्तल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच निवडणूक कामात वनकर्मचारीही व्यग्र असल्याने गावकऱ्यांचे चांगले फावले असून वाघांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात ते घुसखोरी करून वाघांना ठार करत आहेत.

जंगल परिसरात दोन मोठ्या व एका बछड्याची हाडे व कातडी सापडल्याचे पेंच अभयारण्यचे प्रमुख सेऊनी यांनी सांगितले आहे. काळी जादू करण्यासाठीच वाघांना ठार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान वाघांच्या संरक्षणासाठी विशेष टीम बनवण्यात आल्याचेही ते म्हणाले. वाघांच्या पंजाचा व त्यांच्या मिशांचा उपयोग पैशांचा पाऊस पाडण्यासाठी होतो. असे एका मांत्रिकाने गावकऱ्यांना सांगितल्याने. म्हणूनच सगळे जण वाघांना ठार करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे अवयव आम्हांला आढळले, असेही सेऊनी यांनी सांगितले.