नगर शहरात 700 किलो गोमांस जप्त, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील झेंडीगेट भागात स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने गोहत्या करून गोमांस विक्री करणार्‍या अड्यावर छापा टाकून सुमारे 700 किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गोमांसाची बाजारात किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे. या कारवाईमुळे शहरता एकच खळबळ उडाली आहे.

आरोपींमध्ये अब्दुल हक जलील कुरेशी (वय 39, रा.झेंडीगेट,नगर), मोहसिकन कदीर कुरेश, वाहीद इसाक कुरेशी, अस्लम कुरेशी, हपीज कुरेशी (सर्व रा.नगर) यांचा समावेश आहे. झेंडीगेट परिसरात अवैधरित्या जनावरे बांधून ठेवली असून काहींची कत्तल केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने आज या ठिकाणी छापा टाकून तीन मोठ्या जनावरांचे व दोन वासरांचे गोमांस आढळले. तसेच आठ गायी कत्तल खान्याच्या शेजारी बंद खोलीत डांबून ठेवलेली होती.
या कारवाईत पोलिसांनी अब्दुल हक याला अटक केली असून इतर चार जण फरार आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस ज्ञानेश पडतरे, वेठेकर, पकीर शेख, रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष लोंढे, संदिप दरंदले, संदीप पवार, मयुर गायकवाड, संदीप जाधव, विशाल दळवी, संदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.