
सामना प्रतिनिधी । दमण
पालघर येथील दमणमध्ये एकाच वेळी 3 कारखान्यांना भीषण आग लागली आहे. हे तिन्ही कारखाने दाभोळ येथे आहेत. तसेच आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही.
दरम्यान,आगीचे वृत्त कळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या . त्यानंतर जवानांनी जीवावर खेळत कारखान्यात अडकलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. या आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल बनविणाऱ्या कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत.
दमणच्या दाभोळ औद्योगिक कार्यक्षेत्रातील क्रिएटिव गारमेंट्स, रीटा प्लास्टिक आणि बाजूची एक अशा या तीन कंपन्या आहेत.
























































