मी जय श्रीराम म्हणतो, मला अटक करून दाखवा; अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah-attack-

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना यांना आव्हान दिले आहे. मी जय श्रीरामच्या घोषणा देतो मला अटक करून दाखवा असे अमित शहा म्हणाले.  तसेच तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा आपल्याला पश्चिम बंगालमध्ये रॅली करण्यास आडाकाठी करत असल्याचा आरोपही  त्यांनी यावेळी केला. जॉयनगरच्या एका सभेत ते बोलत होते.

शहा म्हणाले की “जर कोणी जय श्री रामच्या घोषणा दिल्या की ममता दीदी नाराज होता. मी आज इथे जय श्री राम म्हणतो. मी उद्या कोलकातामध्ये असेल जर तुमच्यात हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा.”

बरुईपूरमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवागनगी नाकारल्याबद्दल शहा यांनी बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. “ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत. सभा घेण्यापासून त्या अडवत आहेत. तृणमूल काँग्रेस मला प्रचार करण्यापासून रोखू शकतात परंतु भाजपची विजय यात्रा नाही रोखू शकत.”

पश्चिम बंगाल सरकारने शहा यांना बरुईपूरमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकरली होती. त्यामुळे शहा यांना जाधवपुरमधील सभा रद्द करावी लागली.