
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपच्या अनेक विवाहित महिला आपल्या पतींना पंतप्रधान मोदींना भेटू देत नाही, त्याचे कारण जसे मोदींनी आपल्या पत्नीला सोडले तसेच आपले पतीही आपल्याला सोडतील अशी भिती त्यांना असते असे वादग्रस्त वक्तव्य बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मायावतींनी हे वक्तव्य केले आहे.
BJP women netas afraid of their husbands meeting Modi fearing separation: Mayawati
Read @ANI Story | https://t.co/xf1wQuctzP pic.twitter.com/6rOweSU6Ws
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2019
मायावती म्हणाल्या की, “अलवर बलात्कार प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगले. परंतु जेव्हा मी या प्रकरणी बोलले तेव्हा त्यांनी याचे राजकारण केले. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फायदा मिळेल म्हणून त्यांनी या प्रकरणाचे राजकारण केले. ही बाब अतिशय निंदनीय आहे. तसेही दुसर्याच्या आया बहीणींचा आदर कसा करतात हे त्यांना काय माहित? राजकीय स्वार्थासाठी त्यांनी आपल्या निर्दोष पत्नीला सोडून दिले. इतकेच नव्हे तर मला मिळालेल्या माहितीनुसार भाजपमधील विवाहित महिलांचे पती जेव्हा मोदींकडे जातात तेव्हा त्या महिलांना भिती वाटते. त्यांना वाटतं की ज्या प्रमाणे मोदींनी आपल्या पत्नीला सोडले तसेच आपला पतीही आपल्याला सोडून देतील अशी भिती त्यांना वाटते.” म्हणून देशातील सर्व महिलांना माझे आवाहन आहे की अशा व्यक्तीला आपण मत देऊ नये असेही मायावती म्हणाल्या.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
या टीकेनंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी मायावतींना उत्तर दिले आहे. सीतारमण म्हणाल्या की, “ताई मायावती तुम्ही आमची काळजी करू नका. आमच्या पक्षात महिला संपूर्ण सुरक्षित आहेत. आमच्यामध्ये चांगले आणि मजबूत संबंध आहेत.”
Defence Min Nirmala Sitharaman on Mayawati’s remark on PM: Absolutely disappointing&shocking for her to speak so ill about PM & his personal life, & women in BJP. Behen Mayawati please be assured we’re all absolutely safe, secure&have good professional relationships in our party pic.twitter.com/rwirAYfG84
— ANI (@ANI) May 13, 2019
























































