व्हॉट्सअॅप युजर्ससाठी मोठी बातमी; अॅप अपडेट करा अन्यथा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी मोठी बातमी असून एका अडचणीमुळे व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंगच्या आधाराने तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता आहे. एका स्पायवेअरमुळे असे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपने युजर्सना अॅप अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्राएलमधील सीक्रेटीव एनएसओ ग्रुपने हा स्पायवेअर डेव्हलप केला होता. फक्त मिस कॉल दिला तरी हास्पायवेअर फोनमध्ये जाऊ शकत होता. हा बग व्हॉट्सअॅपच्या ऑडिओ कॉल फीचरमध्ये आला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर ही समस्या दूर करण्यात आली असल्याचे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे. तसेच युजर्सने अॅप अपडेट करण्याचे आवाहन व्हॉट्सअॅपने केले आहे.

सिटीझन लॅबच्या संशोधनानुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला याची माहिती समोर आली होती. इंग्लंडमधील एका मानवाधिकार वकिलाच्या मोबाईलवर एनएसओने स्पायवेअर हल्ला केला होता. हा स्पायवेअर बग एका खासगी कंपनीशी संबंधित होता, असे व्हॉट्सअॅपने सीक्रेटीव एनएसओ ग्रुपचे नाव न घेता सांगितले.