पीएमपीएलची बस हॉटेलमध्ये घुसली, मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात पीएमपीएमएलची भरधाव बस ब्रेक फेल झाल्याने थेट हॉटेलमध्ये घुसल्याने एकच घबराट निर्माण झाली होती. सिंहगड कॉलेजच्या उतारावरून वेगाने निघालेल्या बसचा ब्रेक फेल झाला. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. मात्र बस आणि हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे.

सिंहगड कॉलेज बस थांब्यावरुन स्वारगेटच्या दिशेने बस निघाली होती. मात्र उतारावरून वेगाने येत असताना ब्रेक फेल झाल्याने कठड्याला धडकून येथील सिंहगड फाउंटन या हॉटेलमध्ये घुसली. यावेळी बसमध्ये चालक, वाहकासह इतर दोन ते तीन प्रवासी होते.