वसमत रोडवरील हॉटेल आगीत भस्मसात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

वाढत्या तापमानामुळे अनेक छोट्या मोठ्या आगीच्या घडत आहेत. परभणीतील तापमानाचा पारा 44 अंशावर पोहचला आहे. वसमत रोडवरील एका हॉटेलला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. या आगीत हॉटेल भस्मसात झाले आहे. या हॉटेलच्या आगीच्या घटनेबाबत शहरात साशंकता व्यक्त होत आहे. परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या घटनेकडे कोणचेही लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरापासून अगदी जवळच असलेल्या वरद गार्डन मंगल कार्यालयासमोर विश्वनाथ खनपटे-वांगीकर यांचे हॉटेल ओंकारेश्वर आहे. शनिवारी सकाळी हे हॉटेल आगीत भस्मसात झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आगीत दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये दोन सिलेंडरसह शटर, फर्निचर जळून खाक झाले आहे. तसेच हॉटेलजवळ असलेल्या पानटपरीलाही आगीची झळ बसली. ही आग कशी लागली याबाबत शंका उपस्थित होत आहे.