World Cup 2019 यंदाच्या विश्वचषकात हे नवीन नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या महाकुंभाला उद्या, 30 मेपासून प्रारंभ होत आहे. ‘आयसीसी’ने यंदाच्या स्पर्धेत सात नवीन नियमांचा समावेश केला आहे. खरे तर हे नियम 2017 मध्येच लागू झाले आहेत. मात्र विश्वचषक स्पर्धेत ते प्रथमच वापरले जाणार असून त्याचा सामन्याचा निकालावरही परिणाम होणार आहे. पाहूया ते सात नियम.  

नो बॉलसाठी नवा नियम

गोलंदाजांना दोन टप्प्यांवर चेंडू टाकल्यास तो नो बॉल ठरवला जाईल. याआधी नो बॉलचा हा नियम नव्हता.  

पंच खेळाडूला निलंबित करू शकतात

या नियमानुसार मैदानावरील गैरवर्तनामुळे खेळाडूला सामन्यातून निलंबित करण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. 2017 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.  

…तर फलंदाज धावबाद नाही

धाव घेताना फलंदाजाची बॅट क्रिजमध्ये हवेत असली आणि क्षेत्ररक्षकाने यष्टय़ा उडवल्या तरी खेळाडू आता बाद असणार नाही. याआधी बॅट हवेत असल्यास फलंदाजाला बाद दिले जात होते.

हेल्मेटनेही होणार बाद

फलंदाजाने चेंडू टोलावला अन् क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून तो उडला आणि दुसर्‍या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू झेलला तर फलंदाज बाद दिला जाईल.

बॅटच्या आकाराचे प्रमाण

गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात बरोबरीची लढत होण्यासाठी ‘आयसीसी’ने बॅटचा आकारचे प्रमाण ठरवले आहे. बॅटची लांबी 108 मि.मी, रुंदी 67 मि.मी. आणि कॉर्नर 40 मि.मी. याहून अधिक असू नये.