एसआरएच्या तीन अधिकार्‍यांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) तीन अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने (एसीबी) आज गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या परवानगीसाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून साडेचार लाख रुपये घेण्याचे मान्य केले.

तक्रारदार हे इंटेरिअर डिझाईनचे काम करतात. त्या कामाकरिता वांद्रे येथील एसआरएच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा कामाची परवानगी देण्यासाठी संबंधितांनी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी एसीबी कार्यालयात धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाची एसीबीच्या अधिकार्‍यांनी शहानिशा केली. तेव्हा चौघांनी तक्रारदाराकडून साडेचार लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यामुळे त्या चार जणांविरोधात आज एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर त्या चौघांविरोधात कारवाई केली जाणार आहे.