Video-‘सूर्या’जीरावांच्या प्रकोपानंतर चंद्रपूरकरांना ‘वरुण’राजाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

उन्हामुळे अक्षरश: भाजून निघालेल्या चंद्रपूरकरांना सोमवारी वरुणराजाने मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. पावसासोबतच सोसाट्याचा वाराही सुरू झाल्यामुळे तापलेलं वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेले चंद्रपूरकर अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे सुखावून गेले.

महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेचा कडाका वाढला आहे. मागीत आठवड्यात चंद्रपूरात उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. चंद्रपूर शहरात बुधवारी तापमानाचा उच्चांक गाठत 48 अंश तापमनाची नोंद झाली होती. त्यामुळे चंद्रपूर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. प्रचंड तापमानामुळे हैराण झालेल्या चंद्रपूरकरांना सोमवारी वरुणराजाच्या आगमनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.