
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभेत सपाटून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभेकडे मोर्चा वळवला आहे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्यान विरोधकांची घाई सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी जाहीरनामा समिती स्थापन केली असून खासदार वंदना चव्हाण यांना नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली आहे.
विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती स्थापन…
जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची नियुक्ती…
प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी केली जाहीरनामा समितीची घोषणा…#Elections2019#NCP2019 pic.twitter.com/1Nml53ZaaC
— NCP (@NCPspeaks) June 17, 2019
























































