राज्यातील 27 पॉलिटेक्निक महाविद्यालये वाचवण्यासाठी राज्य सरकारची फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंजिनीयरिंग महाविद्यालयांप्रमाणेच राज्यातील तब्बल 27 पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांमधील पदविका अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी ही महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव मार्च 2019 मध्येच सरकारकडे पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर ही महाविद्यालये वाचवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

या महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने आज विधान परिषदेत दिली.