
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे. वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले असा आरोप आमच्यावर केला गेला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले म्हणून आमच्या बरोबर बसायला तयार आहात का?, असा सवाल वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
लोकसभा निकडणुकीत वंचित आघाडीला मिळालेली मते काही ठिकाणी जास्त होती तर काही ठिकाणी कमी होती. जवळपास 40 लाखांहून अधिक मतदान वंचितला झाल्यामुळे आघाडीचे उमेदवार पडले असा आरोप आमच्यावर होतो. वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करणार्या काँग्रेस नेत्यांनी याबाबत पुराके द्यावेत. पुरावे नसतील तर आमच्यावर विश्वास व्यक्त करणार्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.
ईव्हीएमवर संशय कायम
ईव्हीएमकर घेण्यात येत असलेला संशय कायम आहे. याबाबत 25 तारखेला निवडणूक आयोगाची वेळ मागितली आहे. ईव्हीएमबाबत दिल्लीत आंदोलन केल पाहिजे असे आंबेडकर म्हणाले. सरकार आणि निकडणूक आयोगाला ईव्हीएमकरच मतदान घेण्यात रस असेल तर आपण निकडणूक प्रक्रियेत सहभागीच होऊ नये, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हकी अशी भूमिका त्यांनी मध्यंतरी घेतली होती.


























































