बीडमध्ये पावसाचे आगमन; नामलगावच्या कर्परा नदीला पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या दुष्काळी बीड जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री पावसाचे आगमन झाले. तीन चार तास झालेल्या पावसाने कर्परा नदीला पहिला पूर आला. बीडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री पावसाचे आगमन झाले. या पावसाची गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा होती.

पिण्याच्या पाण्यापासून जनावरच्या चाऱ्यापर्यंत संकट अधिक गडद होत होते, पेरण्या लांबल्या होत्या, खरीप धोक्यात आला होता. अखेर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मध्यरात्रीपासून चार तास झालेल्या पावसाने शहरातून जाणाऱ्या कर्परा नदीला पहिला पूर आला आहे.