विकास सुसाट, नवीन रस्ते, मेट्रो, विमानतळ; 2022 पर्यंत दोन लाख कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत सुमारे 200 किमीचे सुरू असलेले मेट्रोचे वेगवान काम, समृद्धी महामार्ग तसेच नवी मुंबई विमानतळ अशी विकासकामे जोरात सुरू आहेत. या विकासकामांवर सरकार 2022 पर्यंत दोन लाख कोटींचा खर्च करणार असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. मेट्रोच्या कामांवरचाच खर्च 83,977 कोटींवर जाणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

  • मेट्रो ए – दहिसर ते डी. एन. नगर या6 किमीच्या टप्प्यासाठी 1, 351.42 रुपये व मेट्रो बी डी.एन.नगर ते मंडाले 22.6 किमीच्या टप्प्यासाठी 196.31 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2020-21 व 2021-22 मध्ये ही योजना पूर्ण होणार आहे.
  • मेट्रो-3 कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पासाठी 23,136 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प 2021-22 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
  • मेट्रो – 4 वडाळा-कासारवडवली-गायमुख या 32 किमीच्या प्रकल्पासाठी 15,498 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 2021-22मध्ये पूर्ण होणार आहे.
  • मेट्रो-5 ठाणे-भिवंडी-कल्याण या प्रकल्पावर5 कोटी तर मेट्रो-6 लोखंडवाला-जोगेश्वरी-कांजुरमार्गसाठी 6716 कोटी रुपये खर्च होणार आहे.
  • मेट्रो -7 ए व बी छत्रपत्री शिवाजी महाराज टर्मिनल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी-दहिसर-मीरा-भाईंदर प्रकल्पासाठी 12,815 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
  • मुंबईव्यतिरिक्त नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून सुरू आहे. बेलापूर ते पेंढार10 उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेसाठी अंदाजे 2063.63 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

विमानतळासाठी  16,705 कोटी,  ट्रान्स हार्बर लिंकसाठी  17, 843 कोटी

मेट्रोव्यतिरिक्त नवी मुंबईत नवीन एअरपोर्ट बनविण्याचे काम सुरू आहे. एअरपोर्टच्या कामासाठी 16,705 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाला गती देण्यासाठी 17 हजार 843 कोटी रुपये खर्च करून मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग बनवला जात आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गासाठी 55 हजार  कोटींचा खर्च अपेक्षित आहे.