मैत्रेयच्या हजारो गुंतवणूकदारांना दिलासा ना.क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

संपूर्ण देशभरातून मैत्रेय नावाच्या गुंतवणूकदार कंपनीत 49 लाख लोकांनी कोट्यावधी रूपये गुंतवले आहेत. महाराष्ट्रातून 17 लाख लोकांची 2500 कोटी गुंतवणूक असून राज्यातील गुंतवणूकदारांची 1687 कोटी रक्कम असून ही रक्कम गुंतवणूकदारांना तातडीने देण्यात यावी यासाठी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यातील गुंतवणूकदारांचा पैसा प्रक्रिया पूर्ण होताच मिळेल असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिले आहे. त्यामुळे मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

मैत्रेय नावाच्या एका गुंतवणूक कंपनीमध्ये राज्यातून 17 लाख लोकांची गुंतवणूक असून त्याची रक्कम 1687 कोटी आहे. देशभरातून 49 लाख लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असून ती रक्कम 2500 कोटी रूपये इतकी आहे. राज्यातील गुंतवणूकदारांनी ना.जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे याबाबत वारंवार निवेदन सादर केल्यानंतर ना.क्षीरसागर यांनी बुधवार .26 रोजी विधानभवनात गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती व गृह विभागातील अधिकार्‍यांनी बैठक घेतली. यावेळी ना.जयदत्त क्षीरसागर, आ.अनिल बाबर, आ.किशोर पाटील पाचोरा, तरूणकुमार खत्री, उपसचिव अधटराव, तपास अधिकारी मंजूरा परब, कुमारसिंह राठोड, एन.टी.मोरे सिंधूदुर्ग, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी मैत्रेयमधील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याची ग्राहकांचे पैसे घेऊन या कंपनीने पोबारा केला आहे. कोट्यावधी रूपये ग्राहकांचे अडकल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे. हा पैसा ग्राहकांना तातडीने मिळावा यासाठी त्वरीत कारवाई करावी अशी आग्रहाची मागणी बैठकीत केली. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, मैत्रेयच्या 450 ठिकाणची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राजस्थान, मध्यप्रदेशातही या कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही सारी मालमत्ता विक्री करण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून ते तातडीने मिटवण्यासाठी शासनस्तरावर तातडीने प्रयत्न केले जातील असे सांगून या गुंतवणूकदारांचा पैसा लवकरात लवकर कसा मिळेल याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले. ना.जयदत्त क्षीरसागर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला काही अंशी यश आले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.