…तर सर्फराज पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-imran-sarfaraz

सामना ऑनलाईन । मुंबई

चौंक गए ना? पण हा मेसेज व्हायरल झाला आहे. सध्या हिंदुस्थानात वर्ल्ड कपचा फिवर चांगलाच चढला आहे. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज आहे. कधी कपड्यांवरून, कधी निर्णयावरून तर कधी मैदानातील त्याच्या वर्तनामुळे त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती सर्फराज भविष्यात पाकिस्तानचा पंतप्रधान बनणण्याची. ही कल्पनाही हास्यास्पद वाटत असली तरी व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या या मेसेजमधून 1992 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये जुळून आलेला आकड्यांचा योगायोग दाखवण्यात आला आहे. त्यावरूनच हा धम्माल उडवणारा मेसेज व्हायरल झाला आहे.

यंदाचा वर्ल्ड कप आणि 1992 चा वर्ल्ड कप याच्यात बरेच साम्य आहे. पहिला योगायोग म्हणजे 1992 प्रमाणेच यंदाही राउंड – रॉबिन पद्धतीने वर्ल्ड कप खेळला जात आहे. ज्यामध्ये सर्व संघ एकमेकांसोबत खेळतात. दुसरा योगायोग म्हणजे 1992 मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने पहिल्या सात सामन्यांत तीनमध्ये पराजय तर तीनमध्ये विजय मिळवला तसेच एक सामना अनिर्णित राहिला होता. यंदाही असेच झालेले आहे. 92 मध्ये वेस्ट इंडिज आणि हिंदुस्थानकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत पुनरागमन केलं होतं. आता देखील सर्फराजच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवले. 92 मध्ये पाकिस्तानची सुरुवात पराभवानेच झाली होती, तर यंदा देखील पाकिस्तानची सुरुवात पराभवानेच झाली.

मॅच 1992 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान 2019 वर्ल्ड कप
मॅच-1 पराभव पराभव
मॅच-2 विजय विजय
मॅच-3 अनिर्णित अनिर्णित
मॅच -4 पराभव पराभव
मॅच-5 पराभव पराभव
मॅच-6 विजय विजय
मॅच-7 विजय विजय

असे सगळे आकड्यांचे योगायोग लक्षात घेता पाकिस्तान यंदाचा वर्ल्ड कप जिंकू शकतो आणि इम्रान खान यांच्याप्रमाणेच भविष्यात सर्फराज पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकतो असा गमतीशीर दावा करण्यात आला आहे.