मुंबईत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन । मुंबई 

मुंबईला शुक्रवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने झोडपले. या मुसळधार पावसात मुंबईत दोन ठिकाणी वीजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

अंधेरी पश्चिम येथे आरटीओ ऑफिससमोर वीजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला. काशीमा युडियार (60) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. तसेच गोरेगाव पूर्व येथे महाकाली केव्हस रस्त्यावर वीजेचा धक्का लागून चार जण जखमी झाले. त्यातील दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव (60), संजय यादव (24) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर आशादेवी यादव (5) आणि दीपू यादव (24) हे दोघे जखमी झाले.

या व्यतिरिक्त दादर फुल बाजारात भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. त्या तिघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.