प्रलंबित मागण्या पूर्ण करा! हजारो कर्मचार्‍यांच्या संपामुळे विद्यापीठ ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सातवा वेतन आयोग आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या मागण्यांसाठी आज मुंबई विद्यापीठाच्या दीड हजारावर कर्मचार्‍यांनी लाक्षणिक संप केल्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले. यामुळे विद्यापीठाच्या फोर्ट आणि कालिना कॅम्पसमध्ये शुकशुकाट होता. मात्र कामानिमित्त विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्यांची संपामुळे गैरसोय झाली. मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघटना, अधिकारी असोसिएशन क शैक्षणिक कल्याणकारी संघ यांच्या संयुक्त  विद्यमाने हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला.

राज्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजाकणी सुरू झाली परंतु उच्च शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणार्‍या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील अधिकारी-कर्मचार्‍यांना मात्र सरकारने वार्‍याकर सोडले आहे. राज्यातील चौदा अकृषी विद्यापीठांतील अधिकारी-कर्मचार्‍यांना अजूनही सातवा वेतन आयोग लागू केला नाही. त्यामुळे राज्यभरातील विद्यापीठांमधील दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचे पडसाद मुंबईसह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये आज उमटले. मुंबई विद्यापीठात सकाळपासूनच कालिना आणि फोर्ट संकुलातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले.

…अन्यथा 15 जुलैपासून तीक्र आंदोलन

विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील अधिकारी-कर्मचार्‍यांचा अपवाद वगळता सरकारने सर्व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. याबाबत शासनाला मागण्यांबाबत निकेदनात सातव्या वेतन आयोगासोबत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अन्यथा 15 जुलैपासून आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.