
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी आज राज्यसभेत दिली. मराठीसंदर्भात मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली असून या विषयात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मराठीला अभिजात दर्जा देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. साहित्य अकादमीच्या मार्गदर्शनाखालील भाषिक तज्ञ समिती व आणि सांस्कृतिक खात्याबरोबर या विषयावर चर्चा सुरू असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.





























































