
सामना ऑनलाईन। केनिया
केनिया एअरवेजमधून लंडनला जाणाऱ्या एका प्रवाशाचा विमानातून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विमानाच्या लँडिंग कम्पार्टमेंटमधून तो प्रवास करत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.
केनियन एअरवेजमधून प्रवास करणारी ही व्यक्ती विमानाने उड्डाण केल्याच्या काहीवेळानंतरच थेट जमिनीवर एका गार्डनमध्ये पडली. त्यावेळी तिथे एकजण सन बाथ घेत होता. अचानक मोठा आवाज झाला आणि समोरच्या भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आधी काय झाले ते कळलं नाही. पण जवळ जाऊन बघितल्यावर एक व्यक्ती तिथे मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याचे डोके फुटले होते, असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. त्यानंतर त्यानेच पोलिसांनी कळवले.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसली तरी तो आफ्रिकेचा असावा. कारण आफ्रिकेत नागरिकांवर अत्याचार होत असल्याने अनेकजण देश सोडून जात आहेत. अशावेळी विमानाच्या अंडरकेरिजमध्ये स्थलांतरीत लपून बसतात. 2016 साली देखील अशाच प्रकारे एक घटना घडली होती. लागोसहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एका विमानाच्या अंडरकेरिजमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. 2012 साली देखील मोजांबिक जोस मतादा येथील एक 30 वर्षीय व्यक्तीचा विमानातून पडून मृत्यू झाला होता. तो ही विमानाच्या अंडरकेरेजमद्ये बसून प्रवास करत होता.























































