धर्माच्या ठेकेदारांना खासदार नुसरत जहाँ यांनी सुनावले, मला माझा धर्म…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसुत्र व भांगेत कुंकु भरून संसदेत हजर झालेल्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला होता. दारूल उल देवबंद या संघटनेने त्यांच्याविरोधात फतवा जारी केला होता. या फतव्यानंतर पहिल्यांदाच नुसरत जहाँ पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून मला माझा धर्म माहिती असल्याच्या त्या म्हणाल्या.

मी निराधार गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला माझा धर्म चांगलाच माहिती आहे. मी जन्मापासून मुसलमान होते आणि अजूनही मुसलमानच आहे. हा फक्त विश्वासाचा प्रश्न आहे. डोक्याने विचार करण्यापेक्षा चांगल्या मनाने आणि ह्रदयाने विचार करून पाहा, असा सल्लाही खासदार नुसरत जहाँ यांनी धर्माच्या ठेकेदारांना दिला आहे.

भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत सहभागी झाल्या
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा गुरुवार 4 जुलैपासून सुरू झाली आहे. रथयात्रेत प्रमुख अतिथी म्हणून  खासदार नुसरत जहाँ सहभागी झाल्या आहेत. त्यांना भगवान जगन्नाथ यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य लाभले.