
सामना ऑनलाईन । मुंबई
दिग्दर्शक आणि लेखक सुजित यांच्या ‘साहो’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. प्रभास व श्रद्धा कपूर हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं पहिलं गाणं ’सायको सय्या’ नुकतच रिलीज करण्यात आलं. या गाण्याचे वैशिष्ट म्हणजे 4 प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज झालेलं ते पहिलं हिंदुस्थानी गाणं आहे. तनिष्क बागची या गाण्याचे संगीतकार आहेत. तर धवनी भानूशाली हिनं हे गाणं 4 प्रादेशिक भाषेत गायिलं आहे.
या गाण्याबाबतचे अनुभव तिनं एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना व्यक्त केले. “श्रद्धा कपूरसाठी गाणं गाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. . ’सायको सय्या’ या गाण्याने मला हिंदीच नव्हे तर तमीळ,तेलगू, मल्याळम या भाषेत गाण्याची संधी मिळाली. माझ्या कारर्किदीत ऐवढी मोठी संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे.”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. पहिल्यांदाच धवनीनं 4 भाषांमध्ये गाणं गायिलं आहे.
तनिष्क बागची याच्या या गाण्याने नृत्यक्षेत्रात एक नवीन प्रकार आणला आहे. या चारही भाषेतील लोकांसाठी हे गाणे स्फूर्तीदायक आहे, असे तनिष्कनं सांगितले. या वर्षातील बहुप्रतिक्षीत ‘साहो’ चित्रपटासाठी गीत तयार करणं, आव्हान होतं, मात्र, हे गीत तयार करताना समाधान मिळाल्याचेही त्याने सांगितले. या गीताला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. टी सिरीजचे भूषण कुमार म्हणाले की, “ या गीतातून देशाची विविधतेतील एकता दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील विविध भाषा व धर्मातील माणसे एकत्र य़ेवून काय करू शकतात हे या गाण्यातून दाखवीलं आहे, तसेच याची दखल गिनिज बुकने घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.


























































