
सामना प्रतिनिधी । बीड
बीड मतदार संघातील विविध रस्ते कामासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 14 कामांसाठी 32 कोटी रूपये निधी मंजुर करून घेतलाअसल्याची माहिती विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, गणपत डोईफोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील विविध गावाच्या रस्ते कामासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही गावच्या रस्त्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 01) खंडाळा पाटी ते ढेलेवस्ती रस्ता – 226.05 लक्ष 02) रामा 55 ते नागापुर (खु.) रस्ता – 86.61 लक्ष 03) रामा 211 ते धनगरवाडी रस्ता – 179.83 लक्ष 04) रामा 211 ते कोळवाडी रस्ता 45.76 लक्ष 05) इजिमा 115 ते फुकेवाडी रस्ता – 199.16 लक्ष 06) वानगाव ते पैसावस्ती रस्ता – 92.96 लक्ष 07) बोरखेड ते गोलंग्री रस्ता – 240.90 लक्ष 08) खांबा लिंबा पौंडूळ ते नारायणगड रस्ता – 521.05 लक्ष 09) रामा 256 ते रत्नागिरी रस्ता – 166.81 लक्ष 10) रामा 211 ते आहेरवडगाव काटेवाडा रस्ता – 533.77 लक्ष 11) प्ररामा 16 ते फड वस्ती रस्ता – 239.55 लक्ष 12) तांदुळवाडी ते सिरसट वस्ती रस्ता – 287.54 लक्ष 13) आहेर धानोरा ते राम मंदिर इंगोले वस्ती वरवटी रस्ता – 210.01 लक्ष 14) शिवणी ते भिल्ल वस्ती रस्ता – 161.40 लक्ष रूपये.रस्ते कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत, पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी कामांचा सतत पाठपुरावा केल्याबद्दल दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, माजी सभापती अरुण डाके, जि प सदस्य गणपत डोईफोडे, अरुण बॉंगाणे,गोरख धंने यांनी आभार व्यक्त करून यामुळे ग्रामीण भागातील या गावांना पक्के रस्ते झाल्यास त्यांचा दळणवळनाचा प्रश्न मार्गी लागेल असे म्हटले आहे.






























































