जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा, नोटा मोजण्यासाठी मशिन मागवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बुलंदशहर

उत्तर प्रदेशात खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी सकाळी छापेमारी केली. विशेष बाब ही आहे की ही छापे बुलंदशहरचे जिल्हाधिकारी अभय सिंह यांच्या घरावर मारण्यात आले आहे. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री असताना अभय सिंह हे फतेहपूरचे जिल्हाधिकारी होते. त्या काळात हा खाण घोटाळा झाला होता. सीबीआयने मारलेल्या छाप्यांमध्ये अभय सिंह यांच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली आहे की ती मोजण्यासाठी मशिन मागवावी लागली आहेत.

बुधवारी सकाळी दोन गाड्यांमधून सीबीआयचे अधिकारी अभय सिंह यांच्या घरी धडकले. जेव्हा छापा पडला तेव्हा अभय सिंह घरीच होते. जवळपास दोन तास झडती घेतल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचे मशीन मागवले. काही महिन्यांपूर्वीच अभय सिंह यांची बुलंदशहरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यांच्या आधी इथे बी.चंद्रकला या जिल्हाधिकारी होत्या. त्यांच्याही घरी खाण घोटाळ्याप्रकरणीच सीबीआयचे छापे पडले होते.