काँग्रेस मुख्यालयात आर्थिक चणचण; पगारही थांबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-sad

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत सलग दुसर्‍यांदा झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पैशांची चणचण जाणवू लागल्याने दिल्लीतील मुख्यालयाच्या खर्चात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काँग्रेस सेच्वा दलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आली आहे. सेवा दलाला महिन्याच्या खर्चासाठी अडीच लाखांऐवजी दोन लाख देण्यात येत आहेत. तसेच महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसला खर्च कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभकानंतर काँग्रेस मुख्यालयातील कर्मचार्‍यांना वेतन देण्यात आलेले नाही.