बुलढाण्यात भव्य मोटारसायकल रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनानिमित्त माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य मोटारसायकल रॅलीने बुलढाणा शहर दुमदुमून गेले. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून रॅलीस सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘विजयराज शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.

शिवालय येथून निघालेली रॅली संगम चौकातून, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, भगवान महावीर चौकातून सराफा बाजार, तेथून राजे सम्भाजी नगर, संभाजी नगर कमानी जवळून कारंजा चौक, तेथून एडेड चौकातून मोठी देवी त्रिशरन चौक, पेट्रोल पंपासमोरून सर्क्युलर रस्त्याने स्टेट बँक सुंदरखेड शाखेजवळून चांडक यांच्या बंगल्याजवळून, सर्क्युलर रस्ता, तेथून चिंचोले चौक तेथून धाड नाका, बसस्टँड मुठठे ले-आउट, संगम चौकातून शिवनेरी चौकातील श्री गजानन महाराज मंदिर येथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले. रॅलीचा विसर्जनानंतर श्री गजानन महाराजांना महाआरती करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर रॅलीत सहभागी शिवसैनिकांना चहा वाटप करण्यात आला. या रॅलीत शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील आजीमाजी पदाधिकार्‍यांसह शेकडो शिवसैनिक व जनता सहभागी झाली होती. त्यात मुस्लीम, दलीत युवकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. दलीत मुस्लीम युवक शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत होते. त्यावेळी बुलढाणेकरांच्या नजरा या रॅलीकडे आकर्षित झाल्या.

पाथरी : तालुक्यातील बोरगव्हाण येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कुल येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, जि. प. सदस्य माणिकअप्पा घुंबरे, युवासेना उपजिल्हाधिकारी रामचंद्र आम्ले, उपतालुकाप्रमुख तुकाराम हरकळ, सर्वâलप्रमुख रावसाहेब निकम, सत्यनारायण घाटूळ, संतोष जोगदंड, रमेश नाईकल, राधे गिराम, अवधूत जोशी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्यध्यापक बजरंग गिल्डा, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनपेठ : समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी ‘कार्य शिवसेनेचे’ या ब्रीद वाक्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हीतवादी उपक्रम हाती घेतला आहे. यात विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा मदतयज्ञ सुरु करत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. यात विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणीक साहित्य यात शालेय बॅग, रजिस्टर, वह्या, पुस्तके आदी देण्याचा संकल्प केला आहे.
मागील ३ वर्षापासून असणाऱ्या भीषण दुष्काळाने शेतकऱ्यांसह मजुरांचे बेहाल होत आहेत. त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवास करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच यावर्षीही भीषण दुष्काळ असणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिने उलटूनही पावसाचा थागपत्ता लागत नसल्याने मराठवाड्यातील सुमारे नऊ शाळा पाण्याअभावी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची होणारी कसरत आणि पर्यायाने शिक्षण सोडण्याएवढा गंभीर निर्णय घेण्याची विद्यार्थ्यांवर येणारी वेळ ही बाब खटकत असल्याने या कार्यामुळे सतीश घाटगे यांच्याबद्दल मतदारसंघातील शिक्षणप्रेमी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सेलू : तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचे भान ठेवून इतर सर्व खर्चाला फाटा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर हार-तुरे या कार्यक्रमाला फाटा देत गरिब विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आला. सेलू-जिंतुर विधानसभाप्रमुख राम पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शारदा विद्यालयात ४५० विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्याचे वाटप हा सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुकाप्रमुख रमेश डख, महिला आघाडी जिल्हा संघटक मंगलताई कथले, वारकरी संप्रदाय तालुकाप्रमुख विठ्ठल कारके, जिजाभाऊ सोळंके, मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे, व्यंकट साखरे, छत्रुगण मगर, विठ्ठलराव जाधव, अंकुश लोंढे, उपशहरप्रमुख नाथा खांडेकर, सुभाष गायकवाड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन अनिल शिंदे यांनी केले तर आभार रोडगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विजय हिरे, अरुण ताठे, ओंकार पवार, विनोद कटारे, रवि कटारे, दिपक मगर, गुलाब खेडेकर, संतोष काष्टे, कृष्णा तिडके, अमोल बाबर, अभिजीत चव्हाण, शिवम ठोंबरे, गणेश खेत्रे, अनुराग आंबटी, पवन बरडे आदींनी प्रयत्न केले.