बीड परळी हायवेवर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी 

बीड परळी रोडवर अपघाताची मालिकाच सुरू आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ब्रमनाथ तांडाजवळ माल परिवहन वाहतूक बस व मोटारसायकलची धडक झाल्याने मोटारसायकलस्वार प्रकाश उत्तम सानप (रा. गोविंदवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. दर 15 दिवसांत एक अपघात असे अपघात या मार्गावर होत आहेत. रत्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ब्रमनाथ तांडाजवळ परिवहन खात्याची मालवाहतूक करणारी बस तेलगावहून वडवणीकडे येत असताना वडवणीकडुन जाणाऱ्या मोटारसायकलला धडकली. यात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. वडवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.