
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
जम्मू–कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा हिंदुस्थानने घेतलेला निर्णय जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने 13 हिंदुस्थानी मुत्सद्दय़ांना परत पाठवले आहे. हे 13 मुत्सद्दी आपल्या कुटुंबासह पाकिस्तानमधून हिंदुस्थानात परत आले आहेत. आज शनिवारी हे सर्वजण वाघा बॉर्डर ओलांडून हिंदुस्थानात आले.
कश्मीरसंबंधी हिंदुस्थानने निर्णय घेतल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानचे पाकिस्तानातील उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तानमधून हिंदुस्थानात परत जाण्यास सांगितले होते. तेव्हापासून हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन देशांतील संबंध अधिक बिघडले होते.



























































