बुडताना वाचवला पण दारू पिऊन गाडी चालवताना पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वर्सोवा चौपाटीत बुडणाऱया गुरगाव येथील शेअर ब्रोकरला स्थानिकांनी आणि पोलिसांनी वाचवले पण दोन तासांनंतर दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रिशू चोपडा हा हरयाणाच्या गुरगाव येथे राहतो. तो पहिल्यांदाच मित्रांसोबत मुंबईत आला होता. रविवारी पोलीस हे वर्सोवा चौपाटी येथे गस्त करत होते. चोपडा हा बुडाल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने चोपडाला समुद्रातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर चोपडा अंधेरीच्या जे. पी. रोड सुसाट वेगात गाडी घेऊन गेला. त्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली. पोलीस तेथे गेले. पोलिसांनी चोपडा आणि त्याच्या मित्राला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. ते दोघेही दारूच्या नशेत होते. गाडीतून दारूच्या दोन बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते.