टिकटॉकची डिजिटल साक्षरता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiktok-f

युजर्समध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि कोणतीही गोष्ट ऑनलाइन पोस्ट करण्याआधी नीट विचार करण्यास युजर्सना प्रोत्साहन मिळावे, यासाठी टिकटॉकने #WaitASecToReflect या मोहिमेला सुरुवात केली आहे. याआधी टिकटॉकने डिजिटल एम्पॉकरमेंट फाऊंडेशन (डीईएफ) सोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून 10राज्यांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित कापर करण्याकर भर देणारे उपक्रम राबवले जातील. ‘बुरा ना पोस्ट करो, बुरा ना शेअर करो, बुरा ना कमेंट करो’ या विचारावर ही मोहीम असणार आहे. उपक्रमाचा भाग म्हणून टिकटॉकतर्फे युजर्सना कोणताही कंटेंट ऑनलाइन शेअर करताना एक क्षण थांबून त्यावर विचार करण्याची शपथ दिली जाणार आहे, अशी माहिती टिकटॉकच्या पब्लिक पॉलिसी विभागाचे संचालक नितिन सलुजा यांनी दिली.