आदित्य ठाकरे युवा आणि प्रॉमिसिंग नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray-cm-fadnavi

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे युवा आणि प्रॉमिसिंग नेते आहेत. त्यांनी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

जालना येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध पक्षाच्या यात्रावर सडकून टीका केली. पत्रकारांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा प्रश्न विचारला तेंव्हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे युवा आणि प्रॉमेसिंग नेते आहेत. त्यांनी सुरू केलेल्या जनआशीर्वाद
यात्रेचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेना-भारतीय जनता पाक्ष युतीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता फडणविस म्हणाले की, संघर्षाचे वर्ष होते तेंव्हाही आम्ही सोबतच राहिलो आता तर आम्ही सत्तेमध्ये एकत्र आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी काढलेल्या यात्रांना प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगून फडणविस यांनी मागील चार-पाच वर्षात राज्यात युती सरकारने जनहिताची अनेक कामे केल्याची माहिती दिली.

जालना जिल्ह्यात ड्रायपोर्ट, रसायन तंत्रज्ञान संस्था आदी अनेक कामे करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या कामाची सध्याची गती पाहता 2020 साली कदाचित या मार्गावरून प्रवास करता येईल असे वाटते. त्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बीडजिल्ह्यातील 13 हजार ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भाशये काढण्यात आल्याचा अहवाल दिल्याच्या संदर्भात प्रश्न विचारला असता, अद्याप आपण हा अहवाल पाहिला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

cm-devendra-fadnavis

कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील ऊस पीकांवर बंदी घालण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालात शिफारस केली आहे. या संदर्भातील प्रश्नांवर मुख्यमंत्री म्हणाले ऊसाचे संपूर्ण पीक ठिंबक सिंचनावर आणले. शासनाने सुक्ष्म सिंचनासाठी 80 टक्के अनुदानाचा निर्णय घेतलेला आहे.

यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदींची उपस्थिती होती.