मध्य रेल्वेच्या एलटीटी ते रत्नागिरी सहा जादा गणपती स्पेशल ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर 210 हून अधिक गाडय़ा रेल्वेने सोडल्या असताना मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि रत्नागिरीदरम्यान आणखी सहा जादा गाडय़ा चालविण्याचे ठरविले आहे. तसेच दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्प्रेस’ला आणखी तीन अतिरिक्त स्लीपर क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

– ट्रेन क्र. 01227 ः लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी स्पेशल (6 फेऱया) ही स्पेशल ट्रेन 30 व 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी एलटीटीहून रात्री 8.50 सुटून दुसऱया दिवशी सकाळी 6.40 वाजता रत्नागिरीला पोहचेल.
-ट्रेन क्र. 01228 ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सकाळी 8 वा. सुटून एलटीटीला सायं. 4.25 वाजता पोहचणार आहे.
थांबा-  ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
– या गाडीला एक एसी टू टीयर, तीन एसी-3 टीयर, 14 स्लीपर दर्जाचे आणि 6 जनरल सेकंड क्लासचे डबे असणार आहेत. या गाडय़ांचे बुकिंग 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.