
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने रविवारी विंडीजविरुद्घ खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये 150 बळींचा टप्पा गाठला. शमीने 42 व्या कसोटीमध्ये बळींचे दीडशतक झळकावेल असून महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्या पक्तीमध्ये त्याने स्थान मिळवले आहे.
सबीन पार्क मैदानात सुरू असलेल्या कसोटी विंडीजविरुद्ध शमीने पहिल्या डावात 2 बळी घेतले. यासह त्याने जहीर खानला मागे सोडत कसोटी सर्वात वेगाने दीडशे बळींचा टप्पा पार केला. शमीच्या पुढे कपिल देव आणि श्रीनाथ यांचा नंबर आहे. कपिल देव यांनी 39 कसोटीत, तर श्रीनाथ यांनी 40 कसोटीत दीडशे बळी टिपले होते. तर झहीर खानला हा टप्पा गाठण्यसााठी 49 आणि इशांत शर्माला 54 कसोटी खेळाव्या लागल्या.
Tests to 150 wickets (by Indian pacemen)
39 – Kapil Dev
40 – J Srinath
42 – Mohd Shami
49 – Zaheer Khan
54 – Ishant Sharma#IndvWI #IndvsWI #WIvInd#WorldTestChampionship— Mohandas Menon (@mohanstatsman) September 1, 2019
150th Test wicket for @MdShami11 – West Indies 8 down now #TeamIndia #WIvIND pic.twitter.com/pXCs7tKebY
— BCCI (@BCCI) September 1, 2019



























































