
उदगीर येथील निडेबन रोड भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागीने असा सुमारे 36 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. या चोरी प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दीपक बाबूराव गंगाजी (रा. साई आर्केड, निडेबन रोड, उदगीर) यांनी तक्रार दाखल केली. घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घर फोडले. 3 हजार 500 रुपये रोख रक्कम, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल (किंमत सुमारे 22 हजार रुपये), 4 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी (किंमत सुमारे 11,200) असा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




























































